VIDEO : MIM ने धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्य करु नये – Jayant Patil
या चर्चेबाबत काही विधान करण्याची गरज नाही. निधन झालेलं असताना जाणं आणि राजकीय चर्चा करणं ही आमची संस्कृती नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, MIM ने धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्य करु नये
एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव दिला. त्यामुळे राज्यात एकच राजकीय धुळवड सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाले म्हणून राजेश टोपे गेले असतील. अशावेळी राजकीय चर्चा करायची नसते. टोपे यांनी ती केली नसेल याची खात्री आहे. या चर्चेबाबत काही विधान करण्याची गरज नाही. निधन झालेलं असताना जाणं आणि राजकीय चर्चा करणं ही आमची संस्कृती नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, MIM ने धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्य करु नये
