Reliance Jio Smartphone | ‘जिओ फोन नेक्स्ट’, जगातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, रिलायन्सचा दावा

| Updated on: Jun 24, 2021 | 8:10 PM

Reliance कंपनीने भारताला 2G मुक्त करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने नुकताच देशातील सर्वात स्वस्त 5 जी फोन सादर केला आहे.

Follow us on

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बिरुद मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ( Reliance Industries Limited- RIL) 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (RIL AGM 2021) गुरुवारी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनी आगामी काळात उर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता डिजिटल क्षेत्रापाठोपाठ उर्जा क्षेत्रातही रिलायन्स कंपनी सुपरपॉवर होण्याच्या दिशेने पहिले पाऊस पडले आहे. दरम्यान, कंपनीने भारताला 2G मुक्त करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने नुकताच देशातील सर्वात स्वस्त 5 जी फोन सादर केला आहे. (Jio Phone Next | Reliance launches India’s cheapest 5G Smartphone in AGM 2021)

रिलायन्सच्या AGM (वार्षिक सर्वसाधारण सभा) बैठकीत मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त करणार असल्याचे सांगितले. 5G इकोसिस्टम विकसित करण्यासाठी बाजारपेठेत 5G ला सपोर्ट करणारी उपकरणे आली पाहिजेत. त्यासाठी रिलायन्स आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत मिळून काम करत आहे. रिलायन्स जिओमुळे भारताला केवळ 5G तंत्रज्ञानच मिळणार नाही, तर देश 2G मुक्त होणार असल्याचा दावा मुकेश अंबांनी यांनी केला आहे.

JIO Phone Next सादर

रिलायन्स AGM 2021 च्या 44 व्या बैठकीत मुकेश अंबानी यांनी Jio फोन सादर केला आहे. या फोनचे नाव जिओ फोन नेक्स्ट (JIO Phone Next) असे आहे. मुकेश अंबानी यावेळी म्हणाले की, “ग्रामीण भागांना 2-जीपासून मुक्त करण्यासाठी अल्ट्रा किफायतशीर फोनची आवश्यकता आहे. मागील वर्षी मी गुगलच्या सुंदर पिचाई यांच्याशी या विषयावर बोललो. त्यानंतर कंपनीने यासंदर्भात पावलं उचलली. जिओच्या 5 जी फोनचे नाव जिओ फोन नेक्स्ट (JIO Phone Next) असे असेल.”

अंबानी यांनी सांगितले की, हा नवा 5 जी फोन Google आणि Jio अॅप्सना सपोर्ट करेल. गुगल आणि रिलायन्सने संयुक्तपणे बनवलेल्या जिओ फोन नेक्स्टमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाईल. या स्मार्टफोनमध्ये व्हॉईस असिस्टंट, ऑटोमॅटिक रीड-अलाउड ऑफ स्क्रीन टेक्स्ट, लँग्वेज ट्रान्सलेशन, ऑग्युमेंटेड रिअॅलिटी फिल्टर्ससह स्मार्ट कॅमेरा आणि अन्य फीचर्स मिळतील.

Reliance Jio आणि Google कडून स्वस्त 5G स्मार्टफोनची घोषणा यापूर्वीच केली होती. सध्याच्या घडीला पोको M3 प्रो 5 जी हा भारतामधील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 13999 रुपये इतकी आहे. JIO Phone Next ची किंमत याहून कमी असेल, असे बोलले जात आहे. परंतु कंपनीने अद्याप या फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 10 सप्टेंबरला हा फोन बाजारपेठेत दाखल होईल.

Jio Phone ची किंमत किती?

Jio Phone Next या स्मार्टफोनची किंमती किती असेल, याबाबत रिलायन्सकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची किंमत साधारण 4000 रुपयांच्या आसपास असेल. जिओ-गुगलाच हा अँड्रॉईड स्मार्टफोन गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओ हे सध्याच्या घडीला डेटा कन्झम्प्शनच्या बाबतीतल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. रिलायन्स जिओच्या माध्यमातून दर महिन्याला 630 कोटी जीबी डेटा वापरला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Reliance AGM 2021: मुकेश अंबानींची मोठी घोषणा; रिलायन्स जिओ भारताला 2G मुक्त करणार

मोठी बातमी: Reliance JIO कडून मुंबई आणि पुण्यात 5G नेटवर्कच्या टेस्टिंगला सुरुवात