‘नार्वेकर सुप्रसिद्ध वकील, परंतु कालचं वक्तव्य डोक्यावर पडल्यासारखं’-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची टीका

‘नार्वेकर सुप्रसिद्ध वकील, परंतु कालचं वक्तव्य डोक्यावर पडल्यासारखं’-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची टीका

| Updated on: Aug 01, 2023 | 11:11 AM

'राहुल नार्वेकर हे जबाबदारीच्या पदावर बसले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली. ते ज्या पदावर बसून निर्णय देणार आहेत, त्यांचं ते बोलणं आणि सर्वोच्च न्यायायलयाचा निकाल या दोन्ही गोष्टीत विरोधाभास आहेत.

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘राहुल नार्वेकर हे जबाबदारीच्या पदावर बसले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली. ते ज्या पदावर बसून निर्णय देणार आहेत, त्यांचं ते बोलणं आणि सर्वोच्च न्यायायलयाचा निकाल या दोन्ही गोष्टीत विरोधाभास आहेत. 2023 चा राजकीय पक्ष ते 2022 ला आणणार असतील तर ते हास्यासपद आहे.पक्षातली फूट कोर्टानं नाकारली आहे. त्यामुळे 16 आमदारांना अपात्र करावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरची टीका करणं म्हणजे तुम्ही पक्षपाती करण्यासारखं आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने जबाबदारी दिली आहे, त्यामुळे तुम्हाला नि:पक्षपातीपणे निर्णय द्यावा लागेल. नार्वेकर यांच्यासारखा हुशार, सुप्रसिद्ध वकील कोर्टाच्या निकालावरती कशी काय टीका करू शकतात?’, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ‘मल्हारराव होळकर यांनी मंदिर बांधण्यासाठी जी लोकं आणली होती तीच लोकं त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये राहिली आहेत. मंदिराच्या समोर फुल विक्रेते असणारे जे मुस्लिम बांधव आहेत, ते प्रत्येक वर्षी त्र्यंबकेश्वरच्या पायऱ्यांवर चादर आणि धुपारती करत असतात.परंतु, या परंपरेला छेद देत हिंदू-मुस्लिम भेद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे. या प्रकरणात मी प्रतिक्रिया दिली तर आपोआप जितेंद्र आव्हाड हिंदू-मुस्लिम करतात असा आरोप होतो.दुर्दैवाने हजारो वर्षांच्या परंपरेकडे दुर्लक्ष करत जाणीवपूर्वक वाद लावण्याचा प्रयत्न होत आहे’, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Published on: May 17, 2023 01:14 PM