Jitendra Awhad : राजकारण्यांचे MMS, 8 कोटींचा कॅमेरा अन् .. ; नाशिकच्या ‘त्या’ हॉटेलबद्दल आव्हाडांचा गौप्यस्फोट
राज्यातल्या हनीट्रॅप प्रकरणात नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मोठे दावे केलेले आहेत.
असा एकही नेता नाही जो त्याच्या हॉटेलवर गेला नाही. हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावले आहेत. हॉटेल मालकाचं नावं घेतलं तर भूकंप येईल, असं विधान करत राज्यातल्या हनीट्रॅप प्रकरणात नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठे दावे केलेले आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशनात आज हनीट्रॅपचा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी आव्हाड यांनी अनेक मोठे दावे केल्याने आता खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, सरकारनं हे बंद करावं, एवढचं सांगतो. कॉम्प्रोमाईज झालं म्हणता, मग कितना रोकडा लिया किताना दिया? असा सवाल अवहाडांनी उपस्थित केला. तसंच यामुळे अनेक घर संसार उध्वस्थ होणार आहेत. एका रेव्हेन्यू ऑफिसरला 3 कोटी मागण्यात आलेत, अशी माहिती आहे. ज्या हॉटेलमध्ये हे झालं, त्या मालकाच मला नाव घ्यायचं नाही. पण असा एकही पुढारी नाही जो नाशिकला गेला आणि त्याच्याकडे गेला नाही. मी पण त्याला ओळखत नाही, प्रश्न हा आहे की पोलिसांनी बंद केलं पाहिजे. मी त्याला ओळखत नाही त्याला चांगल ओळखतो. मी जर नाव घेतलं तर भूकंप येईल, असा मोठा गौप्यस्फोटच आव्हाडांनी केला आहे.
