एवढा गर्व राजकारणात ठेवू नये! जितेंद्र आव्हाडांचा आशिष शेलारांना इशारा

एवढा गर्व राजकारणात ठेवू नये! जितेंद्र आव्हाडांचा आशिष शेलारांना इशारा

| Updated on: Nov 16, 2025 | 3:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधकांचे तीनतेरा वाजतील या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी गर्वावर टीका करत, उरणमध्ये स्थानिकांना डावलणाऱ्यांना धक्का बसेल असे म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या उरणमधील राजकीय वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शेलार यांनी विरोधी पक्षाचे तीनतेरा वाजतील असे म्हटले होते. यावर बोलताना आव्हाड यांनी गर्विष्ठांना उद्देशून, “गर्विष्ठाचे घर नेहमी रिकामे असते. एवढा गर्व राजकारणात ठेवू नये,” असा इशारा दिला. त्यांनी असेही म्हटले की, “स्थानिकांना डावलून आपण काही करू शकतो, हा जो अहंकार लोकांच्या मनात आला आहे, त्याला कुठेतरी धक्का बसेल.”

उरणमधील स्थानिक आमदार पोतदार यांच्या संदर्भात आव्हाड यांनी सांगितले की, स्थानिकांना डावलून काहीही होणार नाही. सर्व विरोधी पक्षांकडून भावना गाणेकर यांचा एकमेव उमेदवार म्हणून अर्ज भरण्यात आला असून, लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता गाणेकर यांचा विजय निश्चित असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. वाहतूक, पायाभूत सुविधांमधील गैरसोय आणि नगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षाबाबत लोकांमध्ये नाराजी असून, त्यांना बदल हवा आहे असे आव्हाड यांनी अधोरेखित केले.

Published on: Nov 16, 2025 02:59 PM