Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्रा फॉरेन्सिक तपासणीत अडकली

Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्रा फॉरेन्सिक तपासणीत अडकली

| Updated on: May 20, 2025 | 12:36 PM

Jyoti Malhotra forensic investigation : यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप आणि मोबाईल मधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. फॉरेन्सिक तपासणीत काही संशयास्पद व्हिडिओ आणि कॉल डिटेल्स समोर आलेले आहेत.

चौकशीत सहकार्य न करणारी ज्योती मल्होत्रा फॉरेन्सिक तपासणीत अडकली आहे. फॉरेन्सिक तपासणीत ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप, मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योतीच्या लॅपटॉपमधून डिलीट केलेले व्हिडिओ क्लाउड स्टोअरेज मधून जप्त करण्यात आलेले आहेत. तसंच लॅपटॉप आणि मोबाईलमधून पठाणकोट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातले संशयास्पद व्हिडिओ मिळून आलेले आहेत. त्यामध्ये बीएसएफच्या हालचाली, रडार, लोकेशन आणि सेक्युरिटी झोनचे व्हिडीओ असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.

ज्योती मल्होत्राने बरेचसे व्हिडिओ डिलीट केलेले होते. मात्र फॉरेन्सिक टीमने हे व्हिडिओ आता क्लाउड स्टोअरेजमधून रिकव्हर करून जप्त केलेले आहेत. यात अनेक संशयास्पद व्हिडिओ आहेत. सीमावर्ती भागातील मोक्याच्या ठिकाणांबद्दल माहिती देणारे हे व्हिडिओ आहेत. ज्योतीने आंतरराष्ट्रीय नंबरसह दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासासोबत संभाषण केल्याचे कॉल डिटेल्स देखील समोर आले आहेत. ज्योतीचे जीमेल अकाऊंट पाकिस्तानी आयपी अॅड्रेसवरून अनेक वेळा लॉगइन केले गेले आहे.

Published on: May 20, 2025 12:36 PM