जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?

जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?

| Updated on: Jul 05, 2026 | 12:48 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी 22 मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीनंतर प्रतिक्रिया देताना कल्याण काळे यांनी आपल्या विरोधात पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी अंबादास दानवे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. महाविकास आघाडीऐवजी त्यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक का लढवली, हा प्रश्न त्यांच्या पक्षाने विचारायला हवा, असे कल्याण काळे म्हणाले. इतकेच नाही तर त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. आता कल्याण काळेंच्या विजय निकालानंतर महायुतीतून अर्ज करणाऱ्या अंबादास दानवे यांच्या मतांची मोजणी सध्य सुरु आहे. थोड्याच वेळात याचा निकाल समोर येईल.

कल्याण काळे म्हणाले की, मागील वेळी आमच्या 6 जागा होत्या. यावेळी आम्ही फक्त 3 जागांची मागणी केली होती. त्या जागा दिल्या असत्या तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र पॅनलमधील नेत्यांनी आमचं ऐकलं नाही, त्यामुळे निवडणूक लढवावी लागली.

या निवडणुकीत एकूण 74 मतदान झाले. त्यापैकी 48 मते मला मिळाली तर विरोधी उमेदवाराला 26 मते मिळाली. मतदारांनी मला तालुक्याचा वतनदार म्हणून कौल दिला, असेही त्यांनी सांगितले.

Published on: Jul 05, 2026 12:48 PM
Follow Us