Pune News : डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
Pune Viral Video : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये कुकरीने केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला. याकहा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये कुकरीने केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला. डीजे क्रेटेक्सच्या वाढदिवसाचा कुकरीने केक कापतानाचा हा व्हिडिओ आहे. हा केक कापताना बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण देखील उपस्थित असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागातील पबमधला हा व्हिडिओ आहे.
पुण्यातील येरवडा, कल्याणीनगर भाग हा पबमधील वेगवेगळ्या घटनांसाठी कायमच चर्चेत असतो. डीजे क्रेटेक्सचा हा व्हिडिओ देखील याच भागातील पब मधला आहे. या व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली आहे. हा वाढदिवस कधी झाला, त्यात कोण कोण उपस्थित होतं या सगळ्याचा तपास सध्या पोलीसटीव्ही करत आहेत. संबंधित पबमधील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर या प्रकरणी संबंधितांवर कारवाई देखील होऊ शकते.
Published on: Apr 15, 2025 11:08 AM
