कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे, पाहा…

| Updated on: Sep 27, 2022 | 11:36 AM

शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करत आहेत. त्याच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे...

Follow us on

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांसदर्भात महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होतेय. शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) सध्या युक्तिवाद करत आहेत. त्याच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे… 20 जूनपासून सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. 10व्या परिशिष्टानुसार फुटीची मान्यता नाही. जर पक्ष सोडला नव्हता, तर व्हीपचा पालन का केलं नाही?, असा सवाल सिब्बल यांनी मांडलाय. 10वं परिशिष्टानुसार अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. 10 व्या परिशिष्टानुसार शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. 10 व्या अनुसूची नुसार त्यांना दुसरा पर्याय नाही, असंही सिब्बल म्हणाले आहेत.