Hasan Mushrif | किरीट सोमय्यांनी शांततेत दौरा करावा : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif | किरीट सोमय्यांनी शांततेत दौरा करावा : हसन मुश्रीफ

| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 4:08 PM

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले घोटाळे कोल्हापूरमध्ये जाऊन उघडकीस आणणार असल्याची घोषणा करत किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौऱ्याचा निर्धार केला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले घोटाळे कोल्हापूरमध्ये जाऊन उघडकीस आणणार असल्याची घोषणा करत किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौऱ्याचा निर्धार केला आहे. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा सोमय्यांनी चंगच बांधलाय. पण पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आणि सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबावं लागलं. पण यादरम्यान कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता मंगळवार आणि बुधवारी पुन्हा एकदा सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील. दरम्यान, किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौरा शांततेत करावा, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.