Kolhapur | कोल्हापूरकरांची मटण मार्केटकडे पाठ, मात्र मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मटण मार्केट मध्ये कोल्हापूरकरांनी गर्दी टाळल्याचे पाहायला मिळत आहे.गर्दीत जाण्याऐवजी उपनगरातआणि ग्रामीण भागात जाऊन मटण आणायला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.त्यामुळे मटण मार्केट मधील विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.माशांचे दर कमी आल्यामुळे मासे खरेदी कडे मात्र ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मटण मार्केट मध्ये कोल्हापूरकरांनी गर्दी टाळल्याचे पाहायला मिळत आहे.गर्दीत जाण्याऐवजी उपनगरातआणि ग्रामीण भागात जाऊन मटण आणायला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.त्यामुळे मटण मार्केट मधील विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.माशांचे दर कमी आल्यामुळे मासे खरेदी कडे मात्र ग्राहकांचा कल दिसून येत आहे.तर दुसरीकडे मात्र 31 डिसेंम्बरच्या पार्ट्यांचे जोरदार नियोजन सुरू असून घरगुती जेवण बनवून देणाऱ्यांना आज सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी मच्छीचे दर मोठ्या प्रमाणात होते मच्छीची आवक वाढल्यामुळे आता हे दर कोसळल्यामुळे मच्छी खरेदी करण्यासाठी कोल्हापूर मच्छी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी केली आहे तसेच हॉटेल व्यवसायिक वर बंदी आल्यामुळे मच्छी मटन चिकन खरेदी करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी उपासमारीची वेळ आली आहे तसेच ग्राहकांनी 31 डिसेंबर घरीच साजरा करण्याचे ठरविले आहे त्यामुळे मटन दर 6 40 रुपये चिकन चादर 140 रुपये तसेच सुरमई पाचशे रुपये किलो बांगडा 160 रुपये बोंबील चारशे रुपये त्यामुळे यावेळी 31 डिसेंबर नागरिक आपल्या घरीच साजरा करण्यास दिसून येऊ लागले आहे सध्या मच्छी खरेदी करण्यासाठी गर्दी मार्केटमध्ये दिसून येत आहे.
