KSRTC Driver Video: रस्त्यात भरगच्च प्रवाशांची बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच….

KSRTC Driver Video: रस्त्यात भरगच्च प्रवाशांची बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच….

| Updated on: May 01, 2025 | 1:00 PM

कर्नाटकात एका बस चालकाने प्रवाशांनी भरलेली बस थांबवली आणि बसमध्येच नमाज पठण केल्याचं पाहायला मिळालं. संबंधित चालकाची तक्रार करण्यात आल्यानंतर कर्नाटकातील वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (केएसआरटीसी) बस चालकाने कर्तव्यावर असताना प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यातच थांबवली आणि नमाज पठण केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. ही घटना कर्नाटकातील हुबळी येथील असल्याची माहिती आहे. सरकारी बस थांबवून प्रवाशांना उशीर केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, कर्नाटकमधील या बस चालकाच्या नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर कर्नाटकच्या वाहतूक मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बस चालकाचे नाव ए.के. मुल्ला असे असून बस चालक नमाज पठण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही बस हुबळी आणि विशालगड दरम्यान धावत होती. बस क्रमांक KA-27 F 0914 आहे. यावेळी चालकाने रस्त्याच्या मधोमध बस थांबवली. यानंतर तो बसच्या सीटवर बसला आणि नमाज पठण करू लागला. बसमधील एका प्रवाशाने ड्रायव्हरचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. या घटनेचा सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात आहे.

Published on: May 01, 2025 12:55 PM