Kunal Kamra : ‘त्याच्या जीवाला धोका तर त्याला…’, कुणाल कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा मोठा निर्णय

Kunal Kamra : ‘त्याच्या जीवाला धोका तर त्याला…’, कुणाल कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा मोठा निर्णय

| Updated on: Apr 16, 2025 | 7:17 PM

कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराने मुंबई कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यानंतर मुंबई हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा देत जबाब नोंदवण्यावरुन हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. […]

कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराने मुंबई कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यानंतर मुंबई हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा देत जबाब नोंदवण्यावरुन हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कुणाल कामरा यांच्या जिवाला धोका असताना चौकशीला त्याला स्वत: उपस्थित राहण्यासाठी का सांगत आहात ? त्यांच्या जिवाला धोका आहे तर मग आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार का? कुणाल कामराचे स्टेटमेंट घेण्याची गरज आहे का? असा सवाल कोर्टाकडून कऱण्यात आला आहे. इतकंच नाहीतर कुणाल कामराचा जबाब घ्यायचाच आहे तर मुंबई पोलीस तामिळनाडूमध्ये जाऊन जबाब नोंदवू शकतात, असं म्हणत कोर्टाने पोलिसांनाच फटकारल्याचे पाहायला मिळाले आहे.

Published on: Apr 16, 2025 07:17 PM