Ladki Bahin Yojana Video : लाडकी बहीण योजनेवर आदिती तटकरे स्पष्टच म्हणाल्या; ‘त्याला बळी पडू नये..’

Ladki Bahin Yojana Video : लाडकी बहीण योजनेवर आदिती तटकरे स्पष्टच म्हणाल्या; ‘त्याला बळी पडू नये..’

| Updated on: Jan 26, 2025 | 1:34 PM

रायगडमध्ये आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं.

निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे परत करावे, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ 30 लाख अपात्र महिलांनी घेतला असून या सर्व महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, अशी बातमी एका वृत्तपत्रातून देण्यात आली होती. इतकंच नाहीतर या अपात्र महिलांना सरकारकडून तब्बल दीड हजार कोटी रुपये मिळाल्याचेही त्यामध्ये म्हटले होते. या बातमीनंतर एकच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र स्वतः महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत.’, असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय. पुढे त्या असेही म्हणाल्या, काही हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली नाही आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या या खोट्या आहेत. माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये.’ रायगडमध्ये आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात स्पष्टपणे भाष्य केले आहे.

Published on: Jan 26, 2025 01:34 PM