Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो Good News… एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का? लगेच बघा
राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता येण्यास सकाळपासून सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्याचा दहावा हफ्ता आजपासून खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींना साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने त्यांच्या खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले होते. मात्र मात्र अक्षय्य तृतीयेलाही एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर आला नसल्याने लाडक्या बहिणींची निराशा झाली होती. यानंतर दोन दिवसांपूर्वीच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी एप्रिल महिन्याचा हफ्ता लवकरच जमा होईल असे सांगितले होते आणि आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतायंत.
Published on: May 03, 2025 03:35 PM
