Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची वाट पाहताय? ‘या’ तारखेला येणार खात्यात पैसे

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची वाट पाहताय? ‘या’ तारखेला येणार खात्यात पैसे

| Updated on: Apr 08, 2025 | 12:25 PM

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, लाडकी बहीण योजनेचा हफ्ता प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला होणार असे सांगितलं गेले होते. मात्र एप्रिल महिन्याचा हफ्ता अद्याप आला नसल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेनंतर महिलांनी विधानसभेला भरभरून मतं देत महायुतीचा दणदणीत विजय मिळवून दिला. दरम्यान, निवडून आल्यानंतर 1500 रूपयांचे 2100 रूपये करणार असं आश्वासन सरकारकडून महिलांना देण्यात आलं होतं. मात्र अद्याप त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तर जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे आत्तापर्यंत 9 हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र सुरू असलेल्या एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार? याची वाट महिला पाहत आहे. अशातच महिला आणि बाल विकास खात्याकडून यासंदर्भात मोठी माहिती देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात 30 तारखेला अक्षय्य तृतीया असल्याने त्याच मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Apr 08, 2025 12:25 PM