लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांचा गोंधळ

| Updated on: Sep 02, 2022 | 9:41 AM

भाविकांकडून रांगेत दर्शन न घेता गर्दीत दर्शन घेत असल्यामुळे भाविक आणि पोलीस, सुरक्षारक्षकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून रांगेत दर्शन घेण्याच्या सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत. 

Follow us on

नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेला लालबागचा राजाच्या दर्शनासाठी यंदा प्रचंड मोठी गर्दी दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे लालबागच्या राजाचे दर्शन भाविकांना घेता आले नव्हते, त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने लालबागच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे गणेशोत्सामुळे लालबाग गणपतीसमोर भाविकांची मोठी गर्दी होत असून गर्दीला आवर घालणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांना कठीण होऊन बसले आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावली आहे. त्यातच भाविकांकडून रांगेत दर्शन न घेता गर्दीत दर्शन घेत असल्यामुळे भाविक आणि पोलीस, सुरक्षारक्षकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून रांगेत दर्शन घेण्याच्या सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत.