Latur : मंत्री पत्ते खेळले, विरोधकांनी निषेध केला! भडकलेल्या सूरज चव्हाणांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बदडलं

Latur : मंत्री पत्ते खेळले, विरोधकांनी निषेध केला! भडकलेल्या सूरज चव्हाणांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बदडलं

| Updated on: Jul 21, 2025 | 9:05 AM

अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गेल्या आठवड्यात विधान भवनात दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना ताजी असतानाच लातूरमध्ये पुन्हा एक राड्याची घटना घडली आहे. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाने शिवीगाळ करत आणि लाथा-बुक्क्यांनी छावा कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या मारहाणीचे व्हिडीओही समोर आले असून, विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण स्वतः या हल्ल्यात सहभागी असल्याचे दिसून आले.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याभोवतीही वाद निर्माण झाला आहे. विधानमंडळाच्या सभागृहात कोकाटे मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, यावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की,  ती मोबाईलवर आलेली जाहिरात होती, जी स्किप करताना कुणीतरी कॅमेऱ्यात टिपली. मात्र, या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असून, राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे.

Published on: Jul 21, 2025 09:05 AM