Mumbai Local Video : धक्कादायक… कल्याण-डोबिंवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला, कारण ऐकून बसेल धक्का

Mumbai Local Video : धक्कादायक… कल्याण-डोबिंवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला, कारण ऐकून बसेल धक्का

| Updated on: Feb 20, 2025 | 4:36 PM

कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये या चाकू हल्ल्याची घटना घडल्याची माहिती मिळतेय. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये ही घटना घडली.

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. धावत्या लोकलमध्ये एका तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये या चाकू हल्ल्याची घटना घडल्याची माहिती मिळतेय. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये ही घटना घडली. धक्का लागण्याच्या शुल्लक कारणावरून प्रवाशांशी झालेल्या वादातून तरूणाने थेट तीन रेल्वे प्रवाशांवर चाकू हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. चाकूने हल्ला करणाऱ्या या तरूणाचे नाव शेख जिया हुसेन असं असून त्याचं वय 19 वर्ष असं आहे. या धक्कादायक घटनेनंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी हल्लेखोर तरुण शेख जिया हुसेन नावाच्या या तरुणाला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबईत राहणाऱ्या 19 वर्षीय शेख जिया हुसेन या तरुणांने केवळ धक्का लागल्याच्या कारणाने आपल्या खिशातला चाकू काढून तीन प्रवाशांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हे तीघे प्रवासी जखमी झाले झाले आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

Published on: Feb 20, 2025 04:36 PM