Eknath Shinde | लॉकडाऊन हा आवडीचा विषय नाही, पण त्याशिवाय पर्याय नाही - मंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde | लॉकडाऊन हा आवडीचा विषय नाही, पण त्याशिवाय पर्याय नाही – मंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Apr 20, 2021 | 7:52 PM

राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता उद्यापासून 15 दिवस कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. (Lockdown is not a topic of interest, but there is no alternative, Eknath Shinde)

मुंबईः राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता उद्यापासून 15 दिवस कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपलीय. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे म्हणालेत.