VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 5 September 2021
पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. पुण्यातील आठ मतदारसंघातील पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. पुण्यातील आठ मतदारसंघातील पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं राज म्हणाले.
