MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 6:33 PM

पावसाळी अधिवेशनात धक्काबुक्कीप्रकरणी एकूण बारा आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. संजय कुटे, आशिष शेलार, राम सातपुते, पराग आळवणी, योगेश सागर इत्यादी नेत्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) पावसाळी अधिवेशनात धक्काबुक्कीप्रकरणी एकूण बारा आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. संजय कुटे, आशिष शेलार, राम सातपुते, पराग आळवणी, योगेश सागर इत्यादी नेत्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

2) भाजप आमदारांनी दालनात येऊन अरेरावी करत शिवीगाळ केल्याचं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितलं. तसेच ही करावाई योग्य असल्याचंही ते म्हणाले.

3) विरोधी पक्षाच्या आमदारांनी शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. तर धक्काबुक्की करणाऱ्यांना बसू नका असं फडणवीसांनी सांगितल्याचंदेखील जाधवांनी सांगितलं.

4) ओबीसी आरक्षणावरुन आम्ही सरकारला उघडं पाडल्यामुळे आमच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.