Rahul Narvekar : राड्यानंतर राहुल नर्वेकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

Rahul Narvekar : राड्यानंतर राहुल नर्वेकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

| Updated on: Jul 18, 2025 | 4:23 PM

maharashtra Assembly Session : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कालच्या राड्याची गंभीर दखल घेत आमदारांना कडक ताकीद दिली आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.

विधान भवनाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादाने शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत मजल मारली. विधान भवनासारख्या पवित्र ठिकाणी हा प्रकार घडल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याची गंभीर दखल घेत आमदारांना कडक ताकीद दिली आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.

नार्वेकर यांनी घोषणा केली की, यापुढे विधान भवनात अभ्यागतांना प्रवेशास मनाई असेल. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांतील आमदारांचे वर्तन चिंताजनक आहे. आमदारकीची शपथ घेताना संविधानाचे पालन करण्याचे वचन दिले जाते, त्याचे गांभीर्य राखले जावे. त्यामुळे आता फक्त आमदार आणि त्यांच्या अधिकृत स्वीय सहाय्यकांनाच विधान भवनात प्रवेश मिळेल.

याशिवाय, नार्वेकर यांनी मंत्र्यांना विधिमंडळात बैठका घेण्याऐवजी मंत्रालयात बैठका आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. ते पुढे म्हणाले, अपवादात्मक परिस्थितीत विधान भवनात बैठक घेतली, तरी अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयामुळे विधान भवनातील सुरक्षितता आणि शिस्त राखण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Published on: Jul 18, 2025 04:23 PM