Munde Vs Awhad : धनंजय मुंडेंची दबंग स्टाईल एंट्री, समोरून येणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना दिली खुन्नस | VIDEO

Munde Vs Awhad : धनंजय मुंडेंची दबंग स्टाईल एंट्री, समोरून येणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना दिली खुन्नस | VIDEO

| Updated on: Jul 01, 2025 | 3:56 PM

Maharashtra Assembly Monsoon Session : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या दालनात जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे हे आमनेसामने आलेले दिसले.

राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा दूसरा दिवस आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरील गदारोळाने हे अधिवेशन सध्या चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात शेतकरी कर्ज माफी, बीड अत्याचार प्रकरण आणि इतर मुद्यांना धरून चांगलीच खडाजंगी झालेली बघायला मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे 5 मिनिटांसाठी सभागृहाच कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर नाना पटोले यांचं एक दिवसासाठी निलंबन देखील करण्यात आल्याने विरोधकांनी सभात्याग केला. अशातच दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सभागृहाच्या दालनात एकमेकांच्या समोर आलेले बघायला मिळाले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चांगलीच खुन्नस दिलेली दिसली आहे. काही मिनिटांसाठी या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. त्यावेळी देखील त्यांनी एकमेकांवर टाकलेला कटाक्ष हा सर्वांचं लक्ष वेधणारा होता.

Published on: Jul 01, 2025 03:56 PM