Beed Rain | बीडच्या सौताडामधील रामेश्वर धबधबा प्रवाहित

| Updated on: Sep 08, 2021 | 8:42 AM

बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून रामेश्वर धबधब्याची ओळख आहे. तीनशे फुटाहूनही जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकाना भुरळ घालत आहेत. या धबधब्यावरील तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं दोन्ही धारांमधून पाणी कोसळते आहे.

Follow us on

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. अशातच सौताडा येथील रामेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहतो आहे. गत वर्षभरापासून हा धबधबा कोरडा ठाक होता, परंतु दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने हा धबधबा यंदा पहिल्यांदाच ओसंडून वाहताना पहावयास मिळतोय, बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून रामेश्वर धबधब्याची ओळख आहे. तीनशे फुटाहूनही जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकाना भुरळ घालत आहेत. या धबधब्यावरील तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं दोन्ही धारांमधून पाणी कोसळते आहे. रामेश्वर मंदिरामुळे धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही सौताड्याची ओळख आहे. बीड आणि अहमनदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, मात्र कोरोनामुळे पर्यटकांना याठिकाणी बंदी घालण्यात आलीय. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात हिरवा शालू पांघरूण निसर्ग नटलेला दिसतोय. कोरोनामुळे निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना बंदी असल्यानं ही विहंगमय दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.