Crime : पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड… ‘ती’ एक धमकी अन् संपवलं जीवन, बीड हादरलं

Crime : पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड… ‘ती’ एक धमकी अन् संपवलं जीवन, बीड हादरलं

| Updated on: Jul 07, 2025 | 6:37 PM

राज्यामध्ये आज महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या दोन मोठ्या अशा घटना घडलेल्या आहेत. बीड आणि नागपूर जिल्ह्यातील या दोन घटना असून या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.

पैसे दे, अन्यथा पत्नीला घरी आणून सोड… सावकाराने अशी धमकी दिली म्हणून व्यवसायिकान आपलं जीवन संपवलं. बीडमध्ये सावकारी जाचाला कंटाळून कापड व्यवसायिकांनी जीवन संपवलं. वेळेवर पैसे देणं होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड असा तगादा सावकाराने लावला होता. राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजान घेतले होते. याची परतफेड 25 हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे केली होती. मात्र पैसे देऊनही सावकाराचा जाच कमी होत नव्हता. या प्रकरणी सावकार डॉ लक्ष्मण जाधवसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अनैतिक संबंधात अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्यात आली. नागपुरात दिशा रामटेके या 30 वर्षीय महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केली. अनैतिक संबंधात अडचण ठरत पत्नीने 38 वर्षीय चंद्रसेन रामटेके यांचा काटा काढला आहे.

Published on: Jul 07, 2025 06:36 PM