FYJC Admission | अकरावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा, जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

| Updated on: Sep 01, 2021 | 8:03 AM

अकरावीसाठी मागासवर्गीय (Backward Class) आणि अनुसूचित जाती-जमातीच्या (SC-ST) आरक्षणातून (Reservation) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रं जमा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Follow us on

अकरावीसाठी मागासवर्गीय (Backward Class) आणि अनुसूचित जाती-जमातीच्या (SC-ST) आरक्षणातून (Reservation) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रं जमा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र सादर करणं शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोबतच प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून आता 30 दिवस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश निश्चिती करताना सुरूवातीला नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पावती सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. पण त्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर आता पालकांना 30 दिवसांच्या आत नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करू या आशयाच्या हमीपत्रावरही प्रवेश दिला जाणार आहे.