State Cabinet Meeting : इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

State Cabinet Meeting : इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

| Updated on: Apr 29, 2025 | 4:22 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात नवीन पॉलिसी मंजूर करण्यात आलेल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात एका नवीन पॉलिसीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात एका नवीन पॉलिसीला मंजूरी देण्यात आलेली असून यामध्ये पॅसेंजर वाहनांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना काही विशिष्ट रोडवर टोल मुक्ती देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे. ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि ईव्हीची विक्री वाढवी यासाठी तसेच चार्जिंग स्टेशनच्या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे धोरण आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Published on: Apr 29, 2025 04:20 PM