Maharashtra floods : राज्यातील पूरपरिस्थितीबाबत मोदी-फडणवीसांमध्ये काय चर्चा? पतंप्रधानांनी दिलं मोठं आश्वासन

Maharashtra floods : राज्यातील पूरपरिस्थितीबाबत मोदी-फडणवीसांमध्ये काय चर्चा? पतंप्रधानांनी दिलं मोठं आश्वासन

| Updated on: Sep 26, 2025 | 5:07 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राज्यातील पूरस्थितीवर तासभर चर्चा झाली. फडणवीस यांनी पूरग्रस्त भागासाठी एनडीआरएफकडून भरीव निधीची मागणी केली. पंतप्रधानांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महाराष्ट्रातील पूरस्थितीवर तासभर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना निवेदन सादर केले. त्यात राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) माध्यमातून भरीव निधीची मागणी करण्यात आली. पंतप्रधानांनी राज्याला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी कर्जमाफीच्या आश्वासनाची निश्चित पूर्तता करणार असल्याचेही स्पष्ट केले. कर्जमाफीची अंमलबजावणी कधी आणि कशी करावी, याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी तातडीची आर्थिक मदत ही सध्याची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Published on: Sep 26, 2025 05:07 PM