बायकॉट जिओ मोहीम, राजू शेट्टींचाही सहभाग; महादेवी हत्तीणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

बायकॉट जिओ मोहीम, राजू शेट्टींचाही सहभाग; महादेवी हत्तीणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

| Edited By: | Updated on: Jul 31, 2025 | 8:55 PM

नांदणी मठातील हत्तीण वनतारामध्ये हलवल्यानंतर, शिरोळ तालुक्यातील नांदणी आणि परिसरातील ग्रामस्थांनी जिओ कंपनीचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ १८ तासांत ७००० पेक्षा जास्त जिओ ग्राहकांनी आपली सिमकार्डे इतर कंपन्यांकडे पोर्ट केली आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. ग्रामस्थांचा रोष व्यक्त करण्यासाठी हा बहिष्कार सुरू करण्यात आला असून, तो सांगली आणि कर्नाटक राज्यातही पसरू शकतो असा अंदाज आहे.

भूषण पाटील, प्रतिनिधी

कोल्हापूर नांदणी मठातील महादेवी हत्तीण वनतारा मध्ये हलवल्यानंतर शिरोळ परिसरात बायकोट जिओ मोहीम सुरू करण्यात आली आहे. बायकोट जिओ मोहिमेत गेल्या 18 तासात 7 हजारांहून अधिक जिओ ग्राहकांनी आपलं कार्ड पोर्ट केलं आहे. विशेष म्हणजे बायकोट जिओ मोहिमेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील सहभाग घेतला आहे.

शिरोळच्या नांदणी मठातील हत्तीनीला वनतारामध्ये हलवल्यानंतर आता नांदणी ग्रामस्थांनी बायकॉट जिवो ही मोहीम हाती घेतली आहे. अंतर्गत नांदणी सह परिसरातील हजारो जिओचे ग्राहक आपलं सिमकार्ड अन्य कंपन्यांमध्ये पोर्ट करून घेत आहेत. काल अवघ्या काही तासात हजारो ग्राहकांनी आपलं जिओ सिम कार्ड पोर्ट करून घेतल्यानंतर आज देखील जिओ कार्ड पोर्ट करून घेण्यासाठी नांदणीच्या चौकात ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळाली. आमचा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. एक ठिणगी देखील मोठी आग लावू शकते. नांदणी गावातून सुरू झालेली ही मोहीम लवकरच सांगली आणि कर्नाटक मध्ये देखील पोहोचणार असल्याचं यावेळेस या नांदणी ग्रामस्थांनी म्हंटल आहे.

Published on: Jul 31, 2025 03:49 PM