Mahayuti : आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार? शिंदेंचे नेते विरुद्ध भाजप आमने-सामने

Mahayuti : आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार? शिंदेंचे नेते विरुद्ध भाजप आमने-सामने

| Updated on: Jul 29, 2025 | 9:08 AM

राज्यामध्ये डान्सबारच्या आरोपांवरून रंगलेला वाद हळूहळू शिंदेंचे नेते विरुद्ध भाजप असा होत असल्याचं दिसत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार कसा? असा प्रश्न करत विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये तथ्य असल्यास चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र योगेश कदम यांच्या पाठीशी आपण उभे असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय.

गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबारच्या आरोपाचा वाद शिगेला पोहोचलाय. हा वाद आता शिंदे विरुद्ध भाजप असेही रूप घेऊ पाहातोय. कारण अनिल परबांच्या आरोपानंतर तथ्य असल्यास चौकशी करू असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय. दुसरीकडे मी आणि शिवसेना तुझ्या सोबत आहे असं म्हणत शिंदेंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पाठराखण केलीय.

कांदिवलीमध्ये रामदास कदमांच्या मालकीचा सावली हॉटेल आणि बार वादात आलाय.कदमांच्या दाव्यानूसार हे हॉटेल त्यांनी एका शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिले. मात्र हॉटेलची मूळ मालकी रामदास कदमांच्या पत्नी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने आहे. त्याच बारावर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकून २३ बार बालाना ताब्यात घेतलं. त्याचा स्पष्ट उल्लेख पोलीस पंचनामा मध्ये आहे आणि यावरून आरोप प्रत्यारोप काय झाले ते पाहुयात.

खुद्द पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेतलेल्या महिलांना बारबाला म्हटलंय. रामदास कदमांच्या दाव्यानूसार त्या बारबाला नसून महिला वेटर आहेत. विरोधकांच्या आरोपानुसार तिथे डान्सबार चालत होता. रामदास कदमांच्या मते तो डान्सबार नसून फक्त बार होता. गृहराज्यमंत्र्यांच्याच आईच्या नावाने राज्यात डान्सबार कसा काय चालतो? यावर विरोधक प्रश्न विचारतायत. कदमांच्या दाव्यानूसार तो डान्सबार नसून बार रेस्टॉरंटसह ऑर्केस्ट्रा आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्यावर चौकशीमध्ये काही गैरआढळलं तर त्याला दोषी बारचा चालक ठरतो बारचा मालक नव्हे असं रामदास कदमांचं म्हणणं आहे.

Published on: Jul 29, 2025 09:08 AM