Maharashtra Mock Drills : युद्धाचं सावट… महाराष्ट्रातील ‘ही’ 3 शहरं अतिसंवेदनशील, राज्यात 16  ठिकाणी मॉक ड्रिल, विशेष तयारी काय?

Maharashtra Mock Drills : युद्धाचं सावट… महाराष्ट्रातील ‘ही’ 3 शहरं अतिसंवेदनशील, राज्यात 16 ठिकाणी मॉक ड्रिल, विशेष तयारी काय?

| Updated on: May 06, 2025 | 2:25 PM

देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिलेत. देशावर युद्धाचं सावट असताना भारताची तयारी सुरू झाली असून उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलवरून पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. इतकंच नाही तर पाकड्यांच्या मनात आता चांगलीच धाकधूक वाढली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यापैकी महाराष्ट्रातील तीन शहरं ही सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारकडून तीन कॅटेगिरी करण्यात आली आहे. या तीन कॅटेगिरीमध्ये मुंबई, ठाणे, उरण, तारापूरसह अलिबाग, रोहा, पुणे, पिंपरीचा समावेश आहे तर औरंगाबाद, नाशिक, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

Published on: May 06, 2025 02:16 PM