दिलासा ! राज्यात ‘या’ दिवशी मान्सूनची एन्ट्री, यंदा कसा होणार पाऊस?

| Updated on: Jun 03, 2023 | 9:37 AM

VIDEO | विदर्भात यंदा १०० टक्के पावसाची शक्यता, तर राज्यात सरासरी किती टक्के पाऊस होणार?

Follow us on

मुंबई : मे महिन्यातील उन्हानं वैतागलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. घाम आणि उन्हाच्या तडाख्यानं नागरिक वैतागले असताना पाऊस कधी पडेल याची ते वाट पाहत आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनच्या आगमानबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ९५ टक्के पाऊस होणार आहे. तर यंदा राज्यभर होणाऱ्या पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. दिलासादायक म्हणजे केरळमध्ये ४ जून रोजी म्हणजेच रविवारी मान्सून दाखल होणार आहे. यासह यंदा १० जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार यासह विदर्भासाठी आनंदाची बातमी म्हणजे विदर्भात १०० टक्के पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सून पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे IMD ने म्हटले आहे.