MPs Meet Manoj Jarange : महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगे पाटलांची भेट, कारण नेमकं काय? कोण-कोण होतं हजर?

| Updated on: Dec 16, 2025 | 1:46 PM

महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीत विविध पक्षांचे खासदार जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या राजधानी दिल्लीमध्ये आहेत. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत त्यांची भेट घेतली आहे. यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार संदीपान भुमरे आणि खासदार कल्याण काळे यांचा समावेश आहे. जरांगे पाटील हे शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दिल्लीत आले आहेत, आणि त्याच दरम्यान इतर खासदारही त्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ शहांची भेट घेईल. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर खासदारही उपस्थित राहतील. शौर्य पाटील प्रकरण आणि इतर काही महत्त्वाच्या विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे.

Published on: Dec 16, 2025 01:46 PM