Local Body Poll : ‘या’ महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
राज्य निवडणूक आयोग दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या 31 जानेवारीच्या मुदतीपूर्वी या निवडणुका अपेक्षित आहेत. त्याचवेळी, आदित्य ठाकरे दुबार मतदार नावांच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेणार असून, विरोधी पक्षांच्या हरकतींकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग दुपारी 4 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे, ज्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 31 जानेवारीच्या मुदतीपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा 29 महानगरपालिकांचा समावेश आहे. याचवेळी, आदित्य ठाकरे यांचीही पत्रकार परिषद होणार असून, ते मतदार यादीतील दुबार नावांच्या मुद्द्यावर आवाज उठवणार आहेत. विरोधी पक्षांनी यापूर्वीही निवडणूक आयोगाकडे दुबार नावे वगळण्याची मागणी केली होती आणि यावर अद्याप आयोगाने उत्तर दिलेले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Dec 15, 2025 03:04 PM
