रोहित, बघतो तुला घरी गेल्यावर….! काका – पुतणे आणि टोमणे….
सांगलीतील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये तीव्र वाद झाला. अजित पवार आणि जयंत पवार यांच्यात तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशीही शाब्दिक चकमक झाली. रोहित पवार यांनीही या वादात आपले मत मांडले. गावकी, भावकी आणि राजकीय मुद्द्यांवरून ही तीव्र वादविवाद रंगली.
सांगलीतल्या इस्लामपुरात पवार काका-पुतण्यांमध्येच चांगलीच टोलेबाजी रंगली. एकमेकांना कोपरखळ्या मारल्या गेल्या आणि हलक्या शब्दातून तिखट उत्तरंही दिली गेली. निमित्त होतं महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय आणि सभागृह अनावरणाचं. मंचावर एका बाजूला अजित पवार, त्यांच्या बाजूला चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह दिवंगत नेते एन.डी.पाटील यांच्या पत्नी आणि अजित पवारांच्या आत्या सरोज पाटीलही उपस्थित होत्या. सर्वात आधी काका-पुतण्यात गावकी आणि भावकीवरुन टोलेबाजीची सुरुवात झाली.
दोन्ही काका पुतण्यांमध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटलांनीही संधी सोडली नाही. संस्थेला देणगी वा निधी देण्यावरुन आम्ही सोन्याच्या चमचा ताटात घेवून जन्मलेलो नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी मात्र अजितदादांनीच भाजपच्या दादांना उत्तर दिलं. एकमेकांना चिमटे काढण्याची स्पर्धा सुरु असताना जयंत पाटील मागे कसे राहतील. वाळवा तालुक्याचा इतिहास सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांनाच डिवचलं. आंदोलकांना बेदम मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांना बढती मिळाल्यानंतर अजित पवारांचा पक्ष हायजॅक झाल्याची टीका रोहित पवारांनी केली होती, त्यावरुनही मंचावर शेरेबाजी रंगली.
