Maharashtra politics: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचालींना वेग, अशोक चव्हाण शरद पवारांच्या भेटीला
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बैठक होणार आहे. अशोक चव्हाण शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 26, 2022 09:44 AM
