Nagpur Winter Session : ‘एक नंबर’वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत, भाजपच्या चव्हाणांनंतर जयंत पाटलांचीही विधानसभेत टोलेबाजी

| Updated on: Dec 11, 2025 | 10:47 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात एक नंबर आणि दोन नंबर या पदांवरून सध्या राजकीय टोलेबाजी सुरू आहे. जयंत पाटलांनी रविंद्र चव्हाणांच्या विधानानंतर याच विषयावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विरोधी पक्ष नेता म्हणजे भावी मुख्यमंत्री या संकल्पनेवरही चर्चा झाली, तर दिवंगत आर.आर. पाटलांचे एक नंबर संदर्भातील जुने भाषण पुन्हा व्हायरल झाले आहे.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात एक नंबर आणि दोन नंबर या पदांवरून जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या एक नंबरच्या विधानानंतर सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी दिवंगत नेते आर.आर. पाटील यांनी सभागृहात या विषयावर केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला, जे सध्या पुन्हा व्हायरल होत आहे. विधानसभेत बोलताना जयंत पाटलांनी विरोधी पक्ष नेते पदाचे महत्त्व अधोरेखित केले. विरोधी पक्ष नेता हा भावी मुख्यमंत्री मानला जातो, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करत, जयंत पाटलांनी “एका एकनाथ रावांच्या नंतर दुसरे एकनाथराव येत आहेत”, असे म्हटले. त्यांनी अनुभव सांगताना नमूद केले की, लोकशाहीत एकच नंबर खरा अर्थाने महत्त्वाचा असतो, बाकीच्या नंबरला काही अर्थ नसतो. आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा मोठा तोटा झाला आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Published on: Dec 11, 2025 10:47 AM