Bhiwandi Rain : अय्यो….साचलेल्या पाण्यात चक्क उतरला स्पायडरमॅन, कुठला VIDEO होतोय व्हायरल?

Bhiwandi Rain : अय्यो….साचलेल्या पाण्यात चक्क उतरला स्पायडरमॅन, कुठला VIDEO होतोय व्हायरल?

| Updated on: Aug 18, 2025 | 8:50 PM

सध्या सोशल मीडियावर भिवंडीतील साचलेल्या पाण्यात एक स्पायडरमॅन उतरल्याचे पाहायला मिळत आहे. स्पायडरमॅनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. भिवंडीत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पावसाचं पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. तर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एक व्यक्ती स्पायडरमॅनच्या वेशात चक्क रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. स्पायडरमॅनच्या वेशात उतरलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये, हा स्पायडरमॅन भिवंडी शहरातील भाजी मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यात हातात वायपर घेऊन पाणी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. भाजी मार्केटमधील हा स्पायडरमॅन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्पायडरमॅनच्या वेशातील व्यक्तीचे हे कृत्य भिवंडीतील पाणी साचण्याच्या समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केले असल्याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे.

Published on: Aug 18, 2025 08:50 PM