Water Crisis In Maharashtra : पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट

Water Crisis In Maharashtra : पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट

| Updated on: Apr 22, 2025 | 12:59 PM

राज्यावर सध्या पाणीटंचाईचं तीव्र संकट ओढवलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होतं असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

राज्यावर सध्या पाणीटंचाईचं तीव्र संकट ओढवलं आहे. गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी महिलांना अनेक कोस पायपीट करावी लागते आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या मोथा या गावात यंदाही भीषण पाणीटंचाई बघायला मिळत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे इथल्या महिलांवर हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातल्या चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील 7 गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर शहरात देखील कडाक्याच्या उन्हात भटक्या जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती बघायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील 11 हजार 470 ग्रामस्थ टंचाई ग्रस्त आहेत. 60 टँकरने 364 फेऱ्यामारून पाणीपुरवठा केला जात आहे.

Published on: Apr 22, 2025 12:58 PM