Chandrakant Patil | मविआ सरकारला एसटी कर्मचाऱ्यांची पर्वा नाही : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jan 07, 2022 | 4:02 PM

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की," मविआ सरकारला आता एसटी कर्मचाऱ्यांची कसलीही पर्वा राहिलेली नाही, असं दिसून येत आहे.

Follow us on

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. दरम्यान, हा संप मिटवण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा निर्णय घेतला. त्यानंतर काही प्रमाणात एसटी बस सुरू झाल्या. मात्र भाजपचे टीका करणं अजूनही सुरूच आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,” मविआ सरकारला आता एसटी कर्मचाऱ्यांची कसलीही पर्वा राहिलेली नाही, असं दिसून येत आहे. गेल्या २ महिन्यांपासून संपावर असलेल्या ६६,६०७ एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन दिले गेले नाही. कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा द्याव्यात, अशी आमचीही मागणी आहे, मात्र इथे त्यांच्या वेतनाचाच पत्ता नाही”

पाटील यांनी अजून एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत या सरकारला कसलाही विचार नाही. सत्तेत आल्यापासून आपल्या खादाड वृत्तीला कायम ठेवून सरकारने आता कर्मचाऱ्यांचा पगार खायलाही सुरुवात केली आहे. एसटी कर्मचारी सरकारचे विरोधक नसून ते आपल्या न्याय-हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्यावर ही कसली हुकुमशाही? वेतन सोडा त्यांना आपले घर सांभाळण्यासाठी रेशनची सुविधादेखील तुम्ही करू शकला नाहीत, अखेर भाजपाने एसटी कर्मचारी बांधवांसाठी रेशनाची सुविधा केली. सरकारचा हा निष्काळजीपणाचा कारभार कधी संपेल माहीत नाही, मात्र भाजपा सदैव एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”