Ambadas Danve : चड्डी- बनियन गॅंग सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकतेय; अंबादास दानवेंची टीका

Ambadas Danve : चड्डी- बनियन गॅंग सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकतेय; अंबादास दानवेंची टीका

| Updated on: Jul 16, 2025 | 12:51 PM

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज सत्ताधारी पक्षांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर चड्डी-बनियन आंदोलन करण्यात आलं.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा सध्या सुरू असून बुधवारी तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बनियन आणि टॉवेल परिधान करत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेविरोधात ‘महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियन गँगचा निषेध असो’ अशा घोषणा दिल्या. या अनोख्या आंदोलनाची विधान भवन परिसरात जोरदार चर्चा रंगली.

महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले, ’50 खोके एकदम ओके’ यांच्यासाठीच आम्ही हे आंदोलन केले. हे लोक सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत. त्यामुळे आम्ही ‘चड्डी बनियन गँग’ आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुखमंत्र्यांविरोधात हे आंदोलन केले. सत्ताधारी नेत्यांनी या लोकांना आवर घातला असता, तर ही परिस्थिती थांबली असती. मात्र, त्यांचे रोज नवे पराक्रम समोर येत आहेत. त्यामुळे आम्ही बनियन आणि टॉवेल घालून त्यांच्या निषेधार्थ आंदोलन केले.’

Published on: Jul 16, 2025 12:50 PM