Bhandup News : पावसाच्या पाण्यात हाय व्होल्टेज करंट, शॉक लागून तरुणाचा तडफडून मृत्यू, महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! बघा VIDEO
दीपक पिल्ले याने कानात हेडफोन घातले होते येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिला, परंतु कानात असलेल्या हेडफोनमुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या तारांच्या संपर्कात आला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.
मुंबईतील भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात दीपक पिल्ले या 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पिल्ले हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता. परंतु रस्त्यात महावितरणाची वायर खुली होती ज्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आज टीव्ही ९ मराठी घटनास्थळी दाखल होतं नेमकी परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी प्रत्यक्ष दर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, पन्नालाल कंपाऊंड परिसरात विजेच्या हाय व्होल्टेज केबल्स उघड्या तशाच रस्त्यात सोडून दिल्यात होत्या. त्यामुळे पावसाच्या पाण्यातून वाट काढत असताना दीपक पिल्ले या 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र महावितरणाच्या भोंगळ कारभारावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
