Maharashtra Politics : हिंदीवरून महायुतीतच मतभेद, शिंदेंची भूमिका भाजपला सुसंगत तर दादा स्पष्टच म्हणताय….

Maharashtra Politics : हिंदीवरून महायुतीतच मतभेद, शिंदेंची भूमिका भाजपला सुसंगत तर दादा स्पष्टच म्हणताय….

| Updated on: Jun 27, 2025 | 6:22 PM

हिंदीची सक्ती नाही तर राज्यामध्ये मराठीचीच शक्ती आहे असा फडणवीस म्हणाले. तर अनिवार्य शब्द आम्ही हटवलेला आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर पहिली ते चौथी हिंदी नको अशी ठोस भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.

हिंदीवरून महायुती सरकारमध्ये सुद्धा मतभेद पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिंदेंची भूमिका एकच आहे. हिंदीच्या वादावरून ठाकरे बंधू सरकार विरोधात एकत्र आले असले तरी सरकारमध्ये मात्र हिंदीच्या मुद्यावरून मतभेद आहेत. पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका  अजित पवार यांनी मांडली आहे. सरकारमध्ये असून अजित दादांचा हिंदीला विरोध आहे. तर आक्षेप घेणाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ. अनिवार्य शब्द काढला आहे अशी भूमिका एकनाथ शिंदेनी मांडली आहे. म्हणजे एकनाथ शिंदेनी हिंदीला विरोध केलेला नाही. शिंदेंची भूमिका भाजपाला सुसंगत अशीच आहे. राज ठाकरेंचा विरोध मोडण्यासाठी शिंदेंचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. तर हिंदीच्या मुद्यावर भाजपने हिंदीची सक्ती नसल्याचं म्हटलं आहे. फडणवीसांनी पहिली ते चौथी हिंदी सक्ती नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे शरद पवारांनी मात्र ठाकरे बंधूंची हिंदी विरोधातिल भूमिका योग्य असल्याचं सांगत हिंदीला विरोध केला आहे.

Published on: Jun 27, 2025 06:22 PM