Mahayuti : नागरी-लष्करी समन्वयासंदर्भात ‘वर्षा’वर मोठी बैठक, कोणा-कोणाची हजेरी? ऑपरेश सिंदूरवर CM म्हणाले, मी सॅल्यूट…

Mahayuti : नागरी-लष्करी समन्वयासंदर्भात ‘वर्षा’वर मोठी बैठक, कोणा-कोणाची हजेरी? ऑपरेश सिंदूरवर CM म्हणाले, मी सॅल्यूट…

| Updated on: May 12, 2025 | 2:45 PM

या बैठकीमध्ये गुप्तचर माहितीचा आदानप्रदान झालं असून तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची यावर देखील चर्चा झाली आहे. संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली.

नागरी लष्करी समन्वयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारही उपस्थित होते. तीनही दलाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राज्य सरकार अधिक समन्वयाने काम करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत लष्कराचे लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, लष्कराचे कर्नल संदीप सील, रियर अॅडमिरल अनिल जग्गी, नौदलाचे कमांडर नितेश गर्ग त्याचबरोबर वायुदलाचे एअर व्हॉइस मार्शल रजत मोहन, एटीएसचे प्रतिनिधी, होमगार्डचे प्रतिनिधी आणि रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी तसेच जेएनपीटीचे प्रतिनिधी, बीपीटीचे प्रतिनिधी, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधी हे सगळे उपस्थित होते.

‘भारतीय सैन्याने ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबवलं. ऑपरेशन सिंदूर अभूतपूर्व आहे, संरक्षण दलाला मी सॅल्युट करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुंबईसारखं शहर हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. या स्थितीत गुप्तचर माहितीचा आदानप्रदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने काम करावं लागेल, असं फडणवीस म्हणाले.

Published on: May 12, 2025 02:45 PM