Thane Municipal Election: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज

| Updated on: Dec 29, 2025 | 10:31 AM

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. शिंदे गट 87 तर भाजप 40 जागांवर लढणार असून, चार जागांचा तिढा कायम आहे. अंतर्गत वाद आणि नेत्यांमधील नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, आता महायुतीसमोर बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेच्या 131 पैकी 87 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार आहे, तर भाजप 40 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित चार जागांवर अद्याप एकमत झालेले नाही. या जागावाटपाआधीच शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी आणि वाद उफाळून आले आहेत. खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आशुतोष म्हस्के यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला, तर प्रभाग 19 मधून प्रमोद गोगावले यांनी दावेदारी केली आहे. नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपला अधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनंतर दूर झाली आहे. जागावाटप निश्चित झाल्यावर आता महायुतीच्या नेत्यांसमोर बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

Published on: Dec 29, 2025 10:31 AM