Mahayuti Alliance Unity : तोडगा निघाला… सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, रवींद्र चव्हाण अन् शिंदेंच्या बैठकीत काय ठरलं?
महायुती सर्व महापालिका निवडणुका एकत्र लढणार आहे. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीत ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर महापालिकांमधील वाद मिटला आहे. चव्हाण लवकरच पत्रकार परिषद घेऊन या समन्वयाची माहिती देणार आहेत. विधानभवनातील राड्याचा अहवालही सभागृहात ठेवला जाणार आहे.
सर्व महापालिका निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नागपूर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा तोडगा निघाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि उल्हासनगर यांसारख्या महापालिकांमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चर्चेत होता. मात्र, या दोन प्रमुख नेत्यांच्या दोन तासांच्या सकारात्मक बैठकीमुळे हे वाद संपुष्टात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेत अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. महायुतीला या चारही महापालिकांमध्ये फटका बसू नये, हा त्यामागील मुख्य उद्देश होता. थोड्याच वेळात रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबाबत आणि भाजपच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.
