Ashish Shelar : राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड अन् बॅगेत 25 लाख! मालवणमधील पैसेवाटप? शेलार एका वाक्यात म्हणाले…

| Updated on: Nov 27, 2025 | 12:57 PM

मालवणमध्ये नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांसह धाड टाकल्याचा दावा केला. ₹25 लाख आढळल्याचा आरोप त्यांनी केला, ज्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी तद्दन खोटं म्हटले. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मालवणमधील नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्ते विजय किनवडेकर यांच्या घरी धाड टाकून त्यांना पैशांच्या बॅगेसह पकडल्याचा आरोप केला. राणे यांनी इन्स्टाग्राम लाईव्ह करत हे पैसे निवडणुकीसाठी वाटले जात असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, बॅगेत २५ लाख रुपये होते. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी निलेश राणे यांचे आरोप तद्दन खोटं आणि असत्य असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी विजय किनवडेकर हे यापूर्वी नारायण राणे आणि निलेश राणे यांचे प्रचारप्रमुख होते आणि त्यावेळीही पैशांचा वापर झाल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही निलेश राणे यांचे आभार मानत भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीवर टीका केली.

Published on: Nov 27, 2025 12:57 PM