बायकोने Video Call वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने पतीची आत्महत्या

बायकोने Video Call वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने पतीची आत्महत्या

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 10:44 AM

बायकोने लहानग्या लेकीचा चेहरा दाखवला नसल्याने नाराज होऊन नवऱ्याने आत्महत्या (Suicide) केली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

बदलापूर : बायकोने लहानग्या लेकीचा चेहरा दाखवला नसल्याने नाराज होऊन नवऱ्याने आत्महत्या (Suicide) केली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. माहेरी गेलेल्या पत्नीने होळी (Holi) सणाच्या दिवशीही तान्ह्या मुलीचा चेहरा व्हिडीओ कॉलवर दाखवला नाही, या गोष्टीने व्यथित होऊन तरुणाचे आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मुलीचा चेहरा पाहता न आल्याने पित्याने गळफास घेत आयुष्याची अखेर केली. या दुर्दैवी घटनेमुळे हे कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालं आहे.