Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Dec 17, 2025 | 2:32 PM

सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने अटकेचे स्पष्ट आदेश दिले असून, यामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड कायम ठेवला आहे. या निर्णयानंतर कोर्टाने त्यांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या न्यायालयीन प्रक्रियेमुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसला असून, त्यांचे मंत्रिपद देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण १९९६ साली दिघोळे साहेब यांनी दाखल केलेल्या तक्रारीपासून सुरू झाले होते. दिघोळे साहेब यांनी माहिती दिली होती की, आर्थिक दुर्बळ घटकांसाठी राखीव असलेल्या सदनिका माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बळकावल्या होत्या. तब्बल तीस वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आता या प्रकरणाचा निकाल लागला आहे. दिघोळे साहेबांच्या कन्या अंजली दिघोळे यांनी या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात त्यांना यश मिळाले आहे आणि न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झाली आहे.

Published on: Dec 17, 2025 02:30 PM